मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची कामगिरी सरस, जनमताचा कौल

Maharashtra Today

मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सरकारला कोरोना सारख्या भयंकर महामारीशी लढा द्यावा लागत आहे. कोरोना महामारीवर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर किंवा इतर मुद्द्यांच्या आधारे या महाविकास आघाडी सरकारची कामगिरी कशी आहे, याबाबत जनतेचे मत जाणून घेण्यासाठी एबीपी न्यूज(ABP News)-सी व्होटरने सर्व्हे केला आहे. यामध्ये सरासरी ५१.९४ टक्के लोकांनी महाविकास आघाडी सरकारच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केलं आहे. तसेच मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्या कामगिरीवर सरासरी ६१.०५ टक्के जनतेनी समाधान व्यक्त(Uddhav Thackeray’s performance as Chief Minister is excellent) केले आहे. या सर्वेमध्ये सहभागी झालेल्या लोकांना काही प्रश्न विचारण्यात आले, त्यावर त्यांनी आपली मतं नोंदवली आहेत.

विचारण्यात आलेले प्रश्न…

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या कामगिरीवर तुम्ही समाधानी आहात का?

खुप समाधानी- ३७.१४ टक्के
काही प्रमाणात समाधानी- ३७.३२ टक्के
असमाधानी- २२.५२ टक्के
सांगता येत नाही- ३.०२ टक्के

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामगिरीवर तुम्ही समाधानी आहात आहात का?

खुप समाधानी- ४६.०५ टक्के
काही प्रमाणात समाधानी- ३२.६९ टक्के
असमाधानी- १७.६९ टक्के
सांगता येत नाही- ३.५७ टक्के

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button