उद्धव ठाकरेंचा आदेश : महेश कोठेंची शिवसेनेतून हकालपट्टी, तर पवारांचाही तूर्तास नकार

Uddhav Thackeray - Mahesh Kothe - Sharad Pawar

सोलापूर :- शिवसेना (Shiv Sena) नगरसेवक महेश कोठे (Mahesh Kothe) यांची अवस्था आता ‘तेलही गेले, तूपही गेले आणि हाती धुपाटणे आले’ अशी झाली आहे. कारण त्यांची शिवसेनेतून कायमची हकालपट्टी करण्याचे आदेश पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दिले आहे. तर दुसरीकडे त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावरही ब्रेक लागला आहे. राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षप्रवेशाच्या मुद्द्यावरून शिवसेना-राष्ट्रवादीत वाद टाळण्यासाठी त्यांच्या पक्षप्रवेश तूर्तास थांबवला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार महेश कोठे यांची शिवसेनेतून कायमची हकालपट्टी केल्याची माहिती, जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी दिली.

महेश कोठे हे आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. मात्र महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) कुरबूर नको म्हणून त्यांचा प्रवेश लांबणीवर पडल्याचं वृत्त होतं. त्यानंतर लगेचच कोठे यांची हकालपट्टी केल्याची माहिती पुरुषोत्तम बरडे यांनी दिली.

दुसरीकडे महेश कोठे यांचा आजचा राष्ट्रवादीत होणारा प्रवेश लांबणीवर पडला आहे. कोठे यांचा आज सकाळी 11 वाजता पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश नियोजित होता. मात्र महाविकास आघाडीतील नेत्यांच्या अंतर्गत खलबतांनंतर शरद पवार यांनी कोठेंचा प्रवेश तूर्तास रोखला आहे. महाविकास आघाडीत वाद नको म्हणून प्रवेश लांबणीवर गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ही बातमी पण वाचा : शिवसेना नेते महेश कोठे आज राष्ट्रवादीत, पक्षप्रवेशाआधी पवारांशी भेटणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER