खंडणी प्रकरणात उद्धव ठाकरेंचा हात; नवनीत राणांचा लोकसभेत सरळ आरोप

uddhav thackeray - Navneet Rana - Maharastra Today

दिल्ली :- गृहमंत्र्यांच्या १०० कोटींच्या टार्गेटच्या माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आरोपांचे पडसाद आज लोकसभेतही उमटले. या चर्चेत अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी खंडणी प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा हात असल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली.

राणा म्हणाल्यात, माझे सहकारी महाराष्ट्रात खंडणी वसुली करण्याचे काम सुरु आहे असे सांगत आहेत. मी विचारू इच्छिते की, जो व्यक्ती १६ वर्ष निलंबित होता, सात दिवस जेलमध्ये राहिला त्याला कोणत्या आधारे पुन्हा सेवेत घेतले. जेव्हा भाजपाचे सरकार होते तेव्हा उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) सचिन वाझेंना पुन्हा सेवेत घेण्यास सांगितले होते. फडणवीसांनी याला स्पष्ट नकार दिला होता. ज्यादिवशी ठाकरे सरकार आले तेव्हा ठाकरे यांनी परमबीर सिंह (Parambir Singh) यांना फोन करुन सर्वात आधी सचिन वाझेंना (Sachin Waze) सेवेत घेतले! सचिन वाझेंमुळे परमबीर सिंह यांची बदली करण्यात आली.

अशा प्रकारे खंडणी वसूल करण्याचे काम सुरू झाले तर संपूर्ण देशात असे होऊ शकते. ज्याप्रकारे इतरांवरही आरोपांवर लागले आहेत, मला सांगायचं आहे की महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरुनच हे सगले सुरु आहे. बदल्या करणे, खंडणी वसूल करने यामध्ये इतर कोणीही सहभागी नाही. एकट्या मुंबईतून महिन्याला १०० कोटी वसुली होत असेल तर संपूर्ण महाराष्ट्रातून किती होत असेल?

परमबीर सिंह यांच्या पत्रावरुन लोकसभेत शिवसेना आणि भाजपा खासदारांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. भाजपा खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांनी लोकसभेत महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी केली. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी त्यांना प्रत्युत्तर देत आरोप फेटाळून लावले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER