उद्धव ठाकरेंची ‘वर्षा’वर शरद पवारांशी चर्चा ; एकनाथ शिंदे म्हणाले …

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)आज दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची(Narendra Modi) भेट घेणार आहेत. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ (Vasha)या शासकीय निवासस्थानी दोन्ही नेत्यांची प्रदीर्घ चर्चा झाली.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) यांनी या भेटीच्या चर्चेला दुजोरा दिला. मराठा आरक्षणासोबत राज्याशी संबंधित अन्य मुद्द्यांवरही पवार व ठाकरे यांच्यात चर्चा झाली. पंतप्रधानांच्या भेटीसाठी जाणाऱ्या शिष्टमंडळात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचा समावेश असेल, असं एकनाथ शिंदे यांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले .

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज सकाळी ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. या भेटीत करोना स्थितीबरोबरच मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button