उद्धव ठाकरेंची खेळी, संजय राऊतांवर वचक ठेवण्यासाठी सावंत यांनाही मुख्य प्रवक्तेपद

Maharashtra Today

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांना मोठा धक्का देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी बुधवारी राऊत यांच्यासमवेत सेनेचे खासदार अरविंद सावंत(Arvind Sawant) यांना पक्षाचे मुख्य प्रवक्ते म्हणून नियुक्त केले. सप्टेंबरपासून आतापर्यंत राऊत हे एकमेव मुख्य प्रवक्ते होते तर सावंत गेली काही वर्षे पक्षाचे प्रवक्ते होते.

मुख्यमंत्री ठाकरे आणि राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे(Aaditya Thackeray) यांनी गेल्या दोन आठवड्यांत संजय राऊतांनी (Sanjay Raut) केलेल्या बेताल विधानांच्या पार्श्वभूमीवर त्यांना लगाम घालण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती पुढे आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यूपीएचे अध्यक्ष असावे असे त्यांचे विधान कॉंग्रेसच्या जिव्हारी लागले आहे. सामनामधील अग्रलेखात गृहमंत्री अनिल देशमुख(Anil Deshmukh) यांच्यावर टीका केल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसही नाराज आहे.

सेनेच्या सूत्रांनी सांगितले की, अहमदाबादमध्ये पवार आणि अमित शहा यांच्यात झालेल्या गोपनीय भेटीला नकार देणारे ट्विट करत राऊत यांनी केले होते. पण त्यांनी कुठलीही माहिती न घेता त्याकडे दुर्लक्ष करुन चुकीचा संदेश दिला. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणी सरकारवर झालेली टीका, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त
परमबीर सिंग यांचे आरोप आणि त्यानंतरच्या राजकीय घडामोडी उद्धव यांच्या मते योग्य नव्हते, असेही एका नेत्याने म्हटले आहे.

सावंत यांना राऊतांवर नजर ठेवण्यासाठी मुख्य प्रवक्ते म्हणून नेमण्यात आले आहे. “ठाकरे यांच्या नेतृत्वात महा विकास आघाडी सरकार स्थापनेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या आणि सर्व पक्षांत चांगले जाळे असलेले राऊत यांच्याकडे दुर्लक्ष करणे अशक्य आहे, असेही ते नेते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button