उद्धव ठाकरे सक्षमपणे सरकार चालवतायेत हाच बाळासाहेबांचा वारसा – अब्दुल सत्तार

Uddhav Thackeray & Abdhul Sattar.jpg

जालना : बाळासाहेबांचे वारस असल्याचे सिदध करा, अन्यथा खुर्ची सोडा अशी टीका माजी मंत्री विनायक मेटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केली होती. या टिकेला शिवसेनेचे (Shivsena) राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरे हे सक्षमपणे सरकार चालवत आहेत. आणि हाच बाळासाहेबांचा खरा वारसा आहे, असे उत्तर सत्तार यांनी दिले. तसेच भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाही अशी टीका केली होती. या टीकेलाही त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. दानवे हे मुख्यमंत्र्यांवरच काय पंतप्रधानांवर देखील टीका करतात. असेही ते म्हणाले.

सत्तार यांनी आज जालना तालुक्यातील पावसामुळे नुकसान झालेल्या कुंभेफळ,अंतरवाला, भागांत जाऊन कपाशी आणि सोयाबीन पिकांची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले.

मागील काही दिवसांपासून भाजपचे (BJP) जेष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत किंवा शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यावर आता महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी सूचक विधान केले. खडसे राष्ट्रवादीत आले काय आणि शिवसेनेत आले काय, एकसारखेच आहे. महाविकास आघाडीत येण्यासाठी अनेक पहिलवान तयार असून ज्यांना महाविकास आघाडीतील ज्या पक्षात जायचे आहे तिथे त्यांनी खुशाल जावे, असे आवाहन अब्दुल सत्तार यांनी खडसे यांना उद्देशून केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER