मराठा समाजााल न्याय द्या असे उद्धव ठाकरे मोदींना ठामपणे सांगतील ; संजय राऊतांना विश्वास

pm modi-uddhav thackeray-sanjay raut

मुंबई : सुप्रीम कोर्टाच्या (Supreme court) निर्णयानंतर मराठा आऱक्षण (Maratha Reservation) विषय केंद्राच्या अख्त्यारित गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत जाऊन इतक्या मोठ्या समाजाचं नेतृत्व करुन केंद्र सरकाच्या दरबारात प्रश्न मांडणं कर्तव्य आहे. हा गंभीर विषय असून मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत. त्यातून तात्काळ मार्ग काढा आणि मराठा समजााल न्याय द्या सांगण्यासाठी मुख्यमंत्री (CM Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), अशोक चव्हाण (Ashok Chavan) दिल्लीत पोहोचले आहेत. मोदींना (PM Modi) ते ठामपणे सांगतील,’ असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेटली घेतली. सोमवारी रात्री वर्षा बंगल्यावर उशिरापर्यंत दोघांमध्ये चर्चा झाली . दरम्यान यावेळी बैठकीत नेमकी काय चर्चा झाली यासंबंधी संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे .

मुख्यमंत्री दिल्लीत जाऊन पंतप्रधानांना भेटणार आहेत त्यासंबंधी यावेळी चर्चा झाली,’ असे संजय राऊत यांनी सांगितले आहे.

दरम्यान यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेळ मागताच पंतप्रधानांनी तात्काळ दिली असून या बैठकीत तोडगा निघेल असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला आहे.

मराठा, ओबीसी असे अनेक विषय असून प्रत्येकाने आपल्या प्रश्नासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. तसे झाल्यास महाराष्ट्रात वातावरण गढूळ होईल, तणाव निर्माण होईल, अशी भीती संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button