मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 1 वाजता जनतेशी साधणार संवाद, मोठ्या घोषणेची शक्यता

CM Uddhav Thackeray

मुंबई : एकीकडे कोरोनाचा धोका वाढत असताना दुसरीकडे राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले .यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज दुपारी 1 वाजता महाराष्ट्रातील जनतेशी संवाद (Interact)साधणार आहेत.

मुख्यमंत्री लोकल सेवा सुरू करण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. लोकल सेवा सुरू झाल्यानंतर मुंबई पूर्वपदावर येईल, त्यामुळे सर्व कार्यालय आणि उद्योगधंद्यांना चालना मिळेल. सध्या लोकल सेवा ही फक्त अत्यावश्यक सेवेसाठी चालवली जात आहे. त्यामुळे गेल्या 9 महिन्यांपासून लोकलचे दार सर्वसामान्यांसाठी बंदच आहे.

त्याचबरोबर कोरोनावर अखेर लस उपलब्ध झाली आहे. राज्यात कोरोना लशीचे कसे वितरण होणार याबद्दल तयारी सुरू आहे असून लशीचे वितरण करण्यासाठी राज्य सरकार सज्ज आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. त्यामुळे मुख्यमंत्री कोरोनाच्या लशीच्या वितरणाबद्दल काय माहिती देता हे ही पाहण्याचे ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER