‘तुम्ही एक सूड काढा तर आम्ही १० सूड काढू’, उद्धव ठाकरेंचा विरोधकांना इशारा

CM Uddhav Thackeray

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारने (MVA Govt) १ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. त्यानिमित्त सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली आहे, ही मुलाखत शुक्रवारी प्रसिद्ध होणार आहे. त्याआधी संजय राऊत (Sanjay Raut)यांनी ट्विटरवरुन मुलाखतीचा प्रोमो शेअर केला आहे. यावेळी संजय राऊत यांनी उद्या धमाका (Dhamaka)होणार असल्याचं पोस्टमध्ये म्हटलं आहे. या प्रोमोमध्ये उद्धव ठाकरे विरोधकांच्या सर्व आरोपांना जोरदार प्रत्युत्तर देताना दिसत आहेत. या मुलाखतीला ‘अभिनंदन मुलाखत’ असं नाव देण्यात आलं आहे.

संजय राऊत यांनी यावेळी उद्धव ठाकरेंना हे सरकार आपल्याच ओझाने पडेल अशी अनेक ज्योतिषं आणि भाकितं वर्तवली जात आहेत अशी विचारणा केली. यासंबंधी उद्धव ठाकरेंनी भाष्य केलेलं दिसत असून असं बोलणाऱ्यांचे दात पडायला आले आहेत असा टोला लगावला आहे. ‘सूडानेच वागायचं असेल तर तुम्ही एक सूड काढा आणि १० सूड काढू,’ असा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला आहे.

आमच्या अंगावर येणाऱ्यांना ज्यांना ज्यांना कुटुंब, मुलं बाळं आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही धुतळ्या तांदळ्याचे नाहीत. तुमची खिचडी कशी शिजवायची ते आम्ही शिजवू शकतो, असा इशाराही उद्धव ठाकरे देताना दिसत आहेत.

मुख्यमंत्री हात धुवा याच्यापलीकडे काय सांगतात अशी एक टीका वारंवार विरोधकांकडून केली जाते. यासंबंधीबीही संजय राऊत यांनी विचारणा केलेली दिसत आहे. त्यावर उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे की, ‘हात धुतो आहे. जास्त अंगावर आलात तर हात धुवून मागे लागेन. विकृत बुद्धीचे चाळे करु नका. आव्हान मिळलं तेव्हा मला स्फुर्ती येते. आडवं येणाऱ्यांना आडवं करुन महाराष्ट्र पुढे जाईल, असंही ते म्हणाले आहे.

ही बातमी पण वाचा : राऊतांच्या तोंडामुळे शिवसेनेचे किती नुकसान झाले हे निवडणुकीत कळेल; चंद्रकांत पाटलांची टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER