४० दिवसांमध्ये उद्धव ठाकरेंना ‘मुख्यमंत्रिपद’ सोडावे लागेल; आचार्य तुषार भोसलेंचा दावा

Uddhav Thackeray - Acharya Tushar Bhosale

नाशिक : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना साधुहत्येचे पातक फेडावे लागेल. अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना साधूंचे  तळतळाट भोवले. आता येत्या ४० दिवसांत उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार (step down as CM in 40 days) व्हावे लागेल, असे वक्तव्य आचार्य तुषार भोसले यांनी केले आहे.

तुषार भोसले (Tushar Bhosale)यांनी मंगळवारी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर आगपाखड केली. अनिल देशमुख यांना साधुहत्येचा तळतळाट लागला, तसेच तुम्हालाही पाप फेडावे लागणार आहे. आता पुढचा नंबर उद्धव ठाकरेंचा आहे. ठाकरे सरकारची उलटगणती सुरू झाली आहे. ४० दिवसांच्या आत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपद सोडावे लागेल, असा दावा आचार्य तुषार भोसले यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button