उद्धव ठाकरेंना हात जोडून विनंती, संजय राऊतांना पदावरून हटवा – संभाजी भिडे

Sambhaji Bhide-Uddhav Thackeray-Sanjay Raut

सांगली : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी आज सांगली बंदचं आवाहन केलं आहे. परंतु आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीच्या दौऱ्यावर असल्याने सांगली बंद मागे घ्यावे असं आवाहन स्थानिक शिवसेनेच्या नेत्यांनी केलं आहे. मात्र शिवसेनेच्या आवाहनाला संभाजी भिडे यांनी सडेतोड उत्तर दिल आहे.

आमचा शिवसेनेला विरोध नाही. मात्र उदयनराजे भोसले यांच्याबाबत चुकीचं केलेलं विधान कदापि सहन केलं जाणार नाही. संजय राऊत यांनी तारतम्य ठेवून विधान करावे, समाज स्वास्थ बिघडू नये याची काळजी त्यांनी घ्यायला हवी. मात्र त्यांनी उदयनराजे भोसले यांच्याबाबत केललं विधान चुकीचं आहे. आमचा बंद राजकीय सूडबुद्धीने प्रेरित नाही. मुख्यमंत्री आज दौऱ्यावर असल्याने आम्ही मुद्दाम बंदची हाक दिलेली नाही. आमचा शिवसेनेला विरोध नाहीच. केवळ उद्धव ठाकरे यांना हात जोडून एकच विनंती आहे की, संजय राऊतांना पदावरून दूर करावे. अशी मागणीही भिडे यांनी यावेळी केली.

छत्रपतींच्या वंशजांना पुरावे मागणाऱ्या संजय राऊतांवर नितेश राणेंचा हल्लाबोल