राज ठाकरेंच्या ईडी चौकशीतून काहीही निष्पन्न होणार नाही ; उद्धव ठाकरे भावाच्या पाठीशी

Uddhav Thackeray

मुंबई :- कोहिनुर मिलप्रकरणी राज ठाकरे यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) नोटीस पाठवली आहे. २२ ऑगस्ट रोजी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांना मिळालेल्या नोटिसीनंतर विरोधी पक्षांनी तसेच मनसेच्या सर्व कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. आता राज यांना पाठींबा देण्यासाठी त्यांचे बंधू शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया देत उद्याच्या चौकशीतून काही निष्पन्न निघेल असं वाटत नाही, असं म्हणत त्यांची पाठराखण केली आहे.

कॉंग्रेसच्या निमर्ला गावित आणि राष्ट्रवादी काँगेसच्या रश्मी बागल यांनी आज मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला, यावेळी पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे यांना ईडीकडून बजावण्यात आलेल्या नोटीसबद्दल विचारले असता त्यांनी राज ठाकरे यांना सहानुभूती देत आपले मत मांडले . गेल्या अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात राजकीय वाद रंगलेला आहे . मात्र आता उद्धव ठाकरे संकट काळी राज यांच्या मदतीला धावून आपले असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे .

दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर मिल खरेदी प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) नोटीस बजावण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे सुपूत्र उन्मेष जोशी यांनादेखील याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली असून सोमवारी ईडीकडून पाच तास त्यांची चौकशी करण्यात आली.

ही बातमी पण वाचा : भूजबळ प्रवेश: “वेळ आल्यानंतर प्रत्येक गोष्टीचे उत्तर मिळेल” – उद्धव ठाकरे