उद्धव ठाकरे आघाडीत गुदमरतंय; आज ना उद्या ते स्वत:हून बाहेर पडतील : संजय काकडे

Maharashtra Today

पुणे : भाजपचे नेते संजय काकडे(Sanjay Kakade) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत(Uddhav Thackeray) मोठे विधान केले आहे. “मी उद्धव ठाकरेंना चांगलंच ओळखतो. त्यांची महाविकास आघाडीत घुसमट होत आहे. आज ना उद्या ते नक्कीच आघाडीतून बाहेर पडतील, असे विधान संजय काकडे यांनी केले आहे.

यावेळी ते प्रसार माध्यमांशी सवांद साधत होते. “मी गेल्या अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरेंना ओळखतो. त्यांचा संपूर्ण स्वभाव मला माहीत आहे. ते महाविकास आघाडीत गुदमरत आहेत. त्यांचे प्रत्येक स्टेटमेंट पाहा. त्यातून ते निराश दिसत आहेत. त्यांना जे काही चाललंय ते आवडत नाही. ते आज ना उद्या स्वत:हून महाविकास आघाडीतून बाहेर पडतील. ते अधिक काळ आघाडीत राहणार नाहीत. गेली २५ वर्षे शिवसेना युतीत होती. त्यामुळे उद्धव ठाकरेंकडे पाहून मला वाईट वाटते, असे संजय काकडे म्हणाले.

प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती

दरम्यान, संजय काकडे यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी कालच नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काकडे यांच्याकडे नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही महापालिकेच्या निवडणुकीत चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button