‘उद्धव ठाकरेंनी लसीकरण बंद करुन दाखवलं’, किरीट सोमय्यांचा खरमरीत टोला

Kirit Somaiya-CM Thackeray

मुंबई : केंद्र सरकारने घोषित केल्याप्रमाणे उद्यापासून संपूर्ण देशभरात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाचा प्रारंभ होत आहे. मात्र महाराष्ट्रात ही लसीकरण मोहिम सुरू होण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाच्या मंत्र्यांसोबत आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन उपलब्ध लसीचा आढावा घेतला.

त्यानंतर माध्यमांशी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सांगितले की, ४५ वयाखालील नागरिकांसाठी राज्याला लस मिळवण्यात अनेक अडचणी येत आहेत. लसींची उपलब्धता नाही. कमी लस पुरवठ्यामुळे गर्दी, गाेंधळ होऊ शकतो. म्हणून किमान २५ लाख लस कुप्या राज्याला प्राप्त झाल्याशिवाय सरकार १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाचा प्रारंभ करणार नाही. त्यामुळे किमान १५ मेपर्यंत तरी या गटातील नागरिकांना लस टोचणे शक्य नाही, आणि याच मुद्द्यावरुन भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya)यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टोला लगावला. उद्धव ठाकरेंनी लसीकरण बंद करुन दाखवलं, (Uddhav Thackeray stopped vaccination) अशी टीका भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.

ठाकरे सरकार आश्वासने देत होते. सर्वांना मोफत लस आयात करेल. १८ वर्षांच्या वरील सर्वांच लसीकरण १ मे पासून सुरू होईल. आणि आता अधिकृत घोषणा केली की, उद्यापासून लसीकरण थांबविले जाईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी यांनी करुन दाखवलं, असा खरमरीत टोला सोमय्या यांनी लगावला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button