‘मी विरोधी पक्षनेत्यांप्रमाणे वैफल्यग्रस्त नाही’; उद्धव ठाकरेंचा टोला

Uddhav Thackeray and Devendra Fadnavis

मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी गुजरातला भरपूर मदत केली. मोदी संवेदनशील आहेत. ते महाराष्ट्रालाही मदत करतील, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. मी विरोधी पक्षनेत्यासारखा वैफल्यग्रस्त नाही, अशी टीका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर केली आहे.

ही बातमी पण वाचा:- १ जूननंतर लॉकडाऊन वाढणार का? मुख्यमंत्र्यांनी दिले उत्तर…

आज उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर असून मालवणमधील चिवला बीच येथे ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोले लगावले. या चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले आहे.”पंचनामे पूर्ण झाले आहे, याचा आढावा घेतल्यानंतर मदत जाहीर करू. केंद्राच्या निकषाप्रमाणे तत्काळ मदतीचे आदेश दिले आहेत, पण एकूण आढावा घेतल्यानंतर आणखी काय करायचे ते आम्ही करणार.” असे उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले.

केंद्र सरकारनेही अधिकाधिक मदत करावी म्हणून आम्ही विनंती करत आहोत. आम्हाला पंतप्रधानांकडून मोठ्या मदतीची अपेक्षा आहे. पंतप्रधान संवेदनशील आहेत. त्यांनी गुजरातला मदत केली. महाराष्ट्रालाही नक्कीच मदत करतील. आम्हाला राजकारण करायचे नाही, विरोधी पक्षनेत्यांसारखा मी वैफल्यग्रस्त नाही. विरोधकांनी आमची काळजी करू नये. कोकणाचे आणि माझे नाते घट्ट आहे. कोणी कितीही प्रयत्न केला, तरी या नात्यात बाधा येणार नाही, असेही ते म्हणाले.

कायमस्वरूपी आराखडा

सागरी किनारपट्टीच्या भागात कायमस्वरूपी सुविधा उभारणे आवश्यक आहे. हा कायमस्वरुपी आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार केंद्रानेही आम्हाला आवश्यक ती मदत द्यावी, मग ती निधीची असेल किंवा मंजुरीची… ही मदत आम्हाला केंद्राने द्यायला हवी. वारंवार अशा नैसर्गिक आपत्तीत नुकसानीमुळे कायमस्वरूपी उपाययोजना करणे गराजेचे आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

ही बातमी पण वाचा : …मग मुख्यमंत्री केवळ तीन तासांच्याच दौऱ्यावर का? फडणवीसांचा सवाल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button