‘वाझे लादेन आहे का म्हणणारे मुख्यमंत्री कुठे आहेत?, उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा’ – निलेश राणे

nilesh-rane-and-uddhav-thackeray

मुंबई :- मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांचे नाव आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भर पत्रकार परिषदेत वाझेंचा बचाव केला होता. वाझे हे लादेन आहे का? असा सवाल करत त्यांनी वाझेंचा बचाव केला होता. मात्र आता या प्रकरणाचा तपास एनआयएने (NIA) सुरु केल्यापासून वाझेंच्या विरोधात सबळ पुरावे मिळत आहे. आणि याच मुद्द्यावरून भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सचिन वाझे हे लादेन आहे का? असे म्हणणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुठे आहे? असा सवाल करतानाच मुख्यमंत्रीच जर अशा अधिकाऱ्यांची बाजू घेत असतील तर त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांनी पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी निलेश राणे (Nilesh Rane) यांनी केली आहे.

निलेश राणे यांनी एकापाठोपाठ तीन ट्विट करून वाझे प्रकरणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. वाझे लादेन आहे का म्हणणारे मुख्यमंत्री कुठे आहेत? आतंकवाद्यांच्या वस्तू घेऊन जर पोलीस अधिकारी लोकांना ठार मारायला लागले आणि मुख्यमंत्री त्यांची बाजू घ्यायला लागले तर अशा मुख्यमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांनी पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी निलेश राणे यांनी केली आहे.

शिवसेनेला मुकेश अंबानींकडून पैसे काढायचे होते, असं सचिन वाझेंनी म्हटल्याचा मीडिया रिपोर्ट आहे. याचा अर्थ शिवसेना या क्राईममध्ये एक पार्टी आहे. राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे. त्यामुळे याबाबतचं सर्व सत्य बाहेर पडणार नाही म्हणून महाराष्ट्रात ताबडतोब राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी राणे यांनी केली आहे.

25 फेब्रुवारी रोजी अंबानींच्या घराबाहेर जिलेटीनने भरलेली गाडी सापडली. 5 मार्चला मनसुख हिरेनची बॉडी सापडली. 6 मार्चला तपास एटीएसकडे देण्यात आला. पण 2 मार्चलाच वाझेंच्या घराजवळचे सर्व सीसीटीव्ही फुटेज गायब झाले. हेच सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियानच्या केसमध्ये घडलं. पण तिथे आरोपी मोठ्या बापाचा मुलगा आहे म्हणून आजपर्यंत वाचला, असा दावाही त्यांनी केला आहे.

ही बातमी पण वाचा : ‘ठाकरे’ सरकारला आणखी मोठा धक्का, मनसुख हिरेन प्रकरणाचा तपासही एनआयएकडे जाणार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER