लातूरच्या भूकंपामध्ये शरद पवारांनी केलेल्या त्या कृतीतून उद्धव ठाकरेंनी काही तरी शिकावे ; चंद्रकांत पाटलांचा सल्ला

Chandrakant Patil - Uddhav Thackeray - Sharad Pawar - Maharashtra Today

मुंबई :  तौक्ते चक्रीवादळात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray ) कोकण दौऱ्यावर आले . यावरून विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे .

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनीही(Chandrakant Patil) मुख्यमंत्र्यांवर टीका करताना महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar ) मुख्यमंत्री असताना लातूरच्या भूकंपामध्ये त्यांनी केेेलेल्या कृतीच्या उदाहरणाची आठवण करून देत एक सल्ला दिला आहे.

शरद पवार राजकीयदृष्ट्या आमचे कितीही विरोधक असले तरीपण लातूरच्या भूकंपामध्ये शरद पवार लातूरमध्ये तंबू ठोकून राहिले. त्यामुळे तिथली परिस्थिती नियंत्रणात आली. एवढ्या मोठ्या संकटात 8 दिवस राहणं कठीण आहे. आता वादळ आल्यानंतर तिथली हवा बरी आहे. तुम्हाला प्रकृतीच्या समस्या आहेत तर तंबूत नका राहू पण प्रशासनात भिती निर्माण व्हायला हवी, बघा मुख्यमंत्री बसले आहेत, अशी आठवण पाटील यांनी करून दिली.

उद्धव ठाकरे म्हणाले दोन दिवसांत पंचनामे करून मदत जाहीर करू. पण दोन दिवसांत पंचनामे होण्यासाठी त्यांनी तीन दिवस तिकडे जायला हवं होतं. उद्धवजींशी माझं काही वाकडं नाही. ते काही माझे दुश्मन नाहीत पण प्रशासन हे काठी घेऊन बसल्याशिवाय ताळ्यावर येत नसल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button