कृषी विधेयके हे शेतकरी हिताचे कसे नाही याचे उद्धव ठाकरेंनी विश्लेषण करून सांगावे : आचार्य तुषार भोसले

Uddhav Thackeray - Acharya Tushar Bhosale

मुंबई :- महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) भारत बंदला पाठिंबा दिलाय. मविआ प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना माझे आव्हान आहे की कृषी विधेयके हे शेतकरी हिताचे कसे नाहीत ? याचे विश्लेषण त्यांनी महाराष्ट्राला करावे, अशी मागणी आचार्य तुषार भोसले (Acharya Tushar Bhosale) यांनी केली आहे.

कोणाहीकडून लिहून घ्या, पाठांतर करुन या, कोथळा, मावळा आदि. सर्व शब्द त्यात घाला पण तुम्ही विश्लेषण कराच !, असेही ते म्हणाले .

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात देशात सध्या शेतकरी आंदोलनाचा (Farmers Protest) वणवा भडकला आहे. पंजाब, हरयाणातील हजारो शेतकरी दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. शिवसेनेसह (Shiv Sena), काँग्रेस (Congress) व राष्ट्रवादीनं (NCP) या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. यावरून भाजपने त्याच्या भूमिकेवर टीकास्त्र सोडले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER