
पुणे :- राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी यावर कारवाई करावी असे सुचवताना बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणालेत की, सरकार टिकवायचे की नाही हे उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) ठरवावे.
मुंडे यांच्या राजीनामा हा कोर्टाचा विषय आहे, लोक निवडणूक आयोगाकडे का जातात?, असा प्रश्नही त्यांनी केला. राष्ट्रवादीला इब्रत राखायची असेल तर राजीनामा घेतल्याशिवाय पर्याय नाही. राजकारणी ज्ञानी असतो पण काही साधायचे असेल तर तो अज्ञानाचे सोंग घेतो, असे म्हणत त्यांनी धनंजय मुंडेंवर टीका केली.
मुख्यमंत्र्यांच्या आधी पक्ष निर्णय घेईल : शरद पवार
धनंजय मुंडेंवर होणाऱ्या आरोपानंतर आता मुख्यमंत्री अजून निर्णय का घेत नाही, असा प्रश्न विरोधक विचारत आहेत. यावर पवार म्हणालेत की, मुख्यमंत्री निर्णय घेण्याआधी धनंजय मुंडेंबाबत पक्षच निर्णय घेईल. मुंडेवरील आरोप गंभीर आहेत, त्यामुळे मला आधी माझा निर्णय घेऊ द्या, मुख्यमंत्र्यांचे नंतर बघू. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाची वाट पाहण्याची गरज नाही. या निर्णयात कुणावर अन्याय होणार नाही हे पाहणे महत्त्वाचे आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला