कुंडल्या बघणारे आता पुस्तके वाचू लागले, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोमणा 

CM Thackeray - Devendra Fadnavis

मुंबई :- मागच्या पाच वर्षांमध्ये कुंडल्या बघणारे आणि मागच्या वर्षभरात सरकार पाडण्याचा मुहूर्त पाहणारे आता पुस्तक आणि अहवाल वाचू लागले आहेत ही चांगली गोष्ट आहे असा टोमणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना मारला.

महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्या वर्षभरातल्या कामाच्या पुस्तकाचे संदर्भ देत देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सरकारवर टीका केली. त्यावरुन उद्धव ठाकरेंनी हा टोमणा मारला. फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारचा खरपूस समाचार घेतला. मुख्यमंत्र्यांनी त्याला उत्तर दिले. मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दलही भूमिका मांडली. मराठा समाजाला आरक्षण देण्याची लढाई अंतिम टप्प्यात आहे. महाराष्ट्र सरकारने यासाठी वकिलांची फौज आली आहे. मराठा समाजाचे आरक्षण टिकेल हा विश्वास मला आहे असे ठाकरे म्हणालेत.

ते म्हणालेत, करोनावरुन आमच्यावर टीका करत आहेत. मात्र राज्याने एकही आकडेवारी पहिल्या दिवसापासून लपवलेली नाही. विरोधकांनी आमच्यावर टीका जरुर करावी आम्हाला काहीही आक्षेप नाही. मात्र आपल्या धारावी मॉडेलचं कौतुक जगाने केले आहे या गोष्टी विरोधकांना दिसत नाही का? डॉक्टरांची ‘टास्क फोर्स’ निर्माण करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही योजना महाराष्ट्रात योग्य पद्धतीने राबवण्यात आली असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.

ही बातमी पण वाचा : ऐकमेकांची डोकी फोडायचीत तर फोडा, पण विज बिलाचं आश्वासनं पूर्ण करा- देवेंद्र फडणवीस

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER