उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे राहुल गांधी; भाजपाची बोचरी टीका

मुंबई :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बुधवारी राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देताना भाजपा आणि मोदी सरकारवर टीका करण्याच्या नादात, शेतकरी आंदोलनाचा उल्लेख करत “शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे आणि चीन दिसला तर पळे” असा यमक जुळवला. उद्धव ठाकरे यांचं हे विधान भारतीय सैन्यांचा अपमान करणारे आहे, अशी टीका केली व भाजपा नेत्यांनी केली व उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे राहुल गांधी (Rahul Gandhi)आहेत, अशी बोचरी टीका केली.

भाजपाचे प्रवक्ते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) म्हणालेत, उद्धवजी हे महाराष्ट्राचे राहुल गांधी झाले आहेत. त्यांनी ट्विट केले – “चीनसमोर पळ काढे असे निलाजरे विधान करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल भारतीय सैनिकांचा अपमान केला. उद्धवजी हे महाराष्ट्राचे राहुल गांधी झाले आहेत”.

जवानांचा अपमान केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी अतुल भातखळकर यांनी केली. जनता या ‘राहुल गांधीगिरी’चा समाचार घेईलच” असा इशारा दिला.

उद्धव ठाकरे म्हणाले होते

“आपल्याकडच्या शेतकऱ्यांची काळजी घेतलीच पाहिजे. विजेबद्दलचा निर्णय आपण कालच घेतला आहे. पण, जे शेतकरी तिकडे आंदोलन करत आहेत. त्यांची वीज कापली जाते. त्यांची शौचालये तोडली जात आहेत. पाणी बंद केले जात आहे. इतकेच नाही, तर ते देशाच्या राजधानी येऊ नयेत म्हणून त्यांच्या वाटेत खिळे टाकले जात आहेत. ज्या तारेचे कुंपण सीमेवर असायला हवे ते त्यांच्या वाटेत टाकले जाते. शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे आणि चीन दिसला तर पळे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER