उद्धव ठाकरे फक्त स्टंटमन – किरीट सोमय्या

- बुलेट ट्रेनचे काम कोणीही थांबवू शकत नाही

Kirit Somaiya-CM Uddhav Thackeray

ठाणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे केवळ स्टंटमन आहेत. ते बुलेट ट्रेनचे काम रोखू शकत नाहीत, असे भाजपाचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) म्हणालेत.

शिवसेनेवर टीका करताना ते म्हणालेत – काम बंद, हप्ता चालू, ही शिवसेनेची कार्यपद्धती आहे. १३ महिनांच्या काळात उद्धव ठाकरे यांनी फक्त प्रकल्प बंद करण्याचे काम केले आहे.

प्रताप सरनाईक यांच्या विहंग गार्डनमध्ये करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामाची तक्रार करण्यासाठी किरीट सोमय्या यांनी गुरुवारी ठाणे महानगरपालिका आयुक्तांची भेट घेतली. यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलले. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला अनेकदा चपराक लगावली आहे. त्यामुळे मेट्रो किंवा बुलेट ट्रेनचे काम कोणीही थांबवू शकत नाही,असे ते म्हणालेत.

ही बातमी पण वाचा : शेतकऱ्यांच्या प्रोत्साहन निधीला ठेंगा, बेवड्याना सवलत; निलेश राणेंची ठाकरे सरकारवर टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER