पुरातत्व खात्याच्या ताब्यातील किल्ले, मोदींनी महाराष्ट्राच्या ताब्यात द्यावेत – उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray

मुंबई: मुंबईत शिवस्मारकाचं भूमिपूजन झाल्यानंतर बीकेसीतील एमएमआरडीएच्या मैदानातील सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी पुरातत्व खात्याच्या ताब्यातील किल्ले पंतप्रधान मोदींनी महाराष्टाच्या ताब्यात द्यावीत, अशी विनंती केली.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणालेत, शिवरायाचं स्मारक उभारणं हे येड्या गबाळ्याचं काम नाही. त्याकाळात सिंधुदुर्ग किल्ला जसा बांधला होता तसाच शिवस्मारक सरकारने बांधव असं ते म्हणालेत.

दरम्यान पंतप्रधानांनीही उद्धव ठाकरे यांच्या मागणीची दखल घेत साहसी पर्यटनासाठी गड-किल्ले खुले करणार अशी घोषणा केली.