गुजरातप्रमाणे पंतप्रधान मोदी महाराष्ट्रालाही मदत देतील ; उद्धव ठाकरेंना विश्वास

Uddhav-Thackeray-PM Modi

मुंबई :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आज कोकण दौऱ्यावर आहेत. तौक्ते चक्रीवादळानंतर (Tauktae Cyclone) कोकणात झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी ते कोकणात दाखल झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) गुजरातप्रमाणे महाराष्ट्रालाही योग्य मदत करतील, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

कोकणवासियांना (konkan) दिलासा देण्यासाठी आलो आहे. सर्वात आधी रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक आढावा घेतला. जास्त फिरण्यापेक्षा महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष देणार आहे. पंचनामे पूर्ण होताच मदतीबाबत निर्णय घेणार असून कोणत्या निकषावर मदत जाहीर करावी हे आढावा घेतल्यानंतरच ठरवणार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

ही बातमी पण वाचा : पॅकेजवर विश्वास नाही, आवश्यक असेल ती मदत करणार – उद्धव ठाकरेंचे आश्वासन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button