उद्धव ठाकरे कधी नव्हे ते बाहेर पडले त्यांचे पाय जमिनीवर राहावेत यासाठी शुभेच्छा : चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil-CM Uddhav Thackeray.jpg

मुंबई : तौत्के चक्रीवादळामुळे (Tauktae Cyclone)रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ठाकरे यांच्या दौऱ्यावरून भाजप (BJP) नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि प्रवीण दरेकर यांनी जमिनीवरून प्रवास केला. त्यांचा प्रवास हवेतून नाही तर जमिनीवरून होता.फडणवीस यांचा दौरा दोन दिवसांत पूर्ण पण होत आला आहे. उद्धव ठाकरे कधी नव्हे ते बाहेर पडले.त्यांचे पाय जमिनीवर राहावेत यासाठी शुभेच्छा, असे पाटील म्हणाले .

पंतप्रधानांचा बाबतीत रिस्क कमी घेता येते. त्यामुळे हवाई आढावा घेणं योग्य असल्याचं त्यांचं सुरक्षा यंत्रणेने सांगितले. इंदिरा गांधी पण असाच प्रवास केला होता . मोदींचा महाराष्ट्र दौरा ठरला होता. पण हवामान पाहता त्यांना सल्ला दिला गेला की जाणे योग्य नाही म्हणून त्यांनी दौरा रद्द केला. त्यांनी फक्त गुजरात ला मदत केली हा दावा खोटा. त्यांनी प्रत्येक मृताला मदत जाहीर केली आहे. त्यात महाराष्ट्रातले पण लोक येतात, अशी माहिती पाटील यांनी दिली आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button