पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कुटुंबासह ‘मातोश्री’सोडून वर्षा बंगल्यावर मुक्काम

Matoshree-CM Thackeray

मुंबई : ‘मातोश्री’मधूनच (Matoshree) राज्याचा कारभार चालवणारे मुख्यमंत्री अशी टीका सोसणाऱ्या उद्धव  ठाकरे (Uddhav thackeray) यांनी अखेर पहिल्यांदाच वर्षा या निवासस्थानी तीन दिवस  (3 Days)मुक्काम केल्याची माहिती समोर आली आहे. .

मलबार हिल येथील महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी म्हणजे वर्षा बंगल्यावर उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासमवेत तीन दिवस वास्तव्यास होते. शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत शनिवार (२८ नोव्हेंबर), रविवार (२९ नोव्हेंबर) आणि सोमवारी (३० नोव्हेंबर) वर्षा बंगल्यावर वास्तव्यास होते. “पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंब रात्री मुक्कामासाठी वर्षा बंगल्यावर असल्याचे दिसले”, असं मिड डेला शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले.

गेल्या वर्षी २८ नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, पण त्यानंतर वर्षा बंगल्यावर वास्तव्य करण्याऐवजी त्यांनी मातोश्रीवरच राहणेच पसंत केले होते. वांद्रे येथील कलानगर परिसरात असलेले मातोश्री हे ठाकरे यांचे निवासस्थान गेली अनेक वर्षांपासून राजकारणातील एक महत्त्वाचे केंद्र मानले जाते. नोव्हेंबर २०१९ मध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून उद्धव ठाकरे मातोश्री आणि वर्षा बंगला असा प्रवास करताना दिसतात. वर्षा बंगला हा केवळ मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयीन कामकाजासाठी आणि बैठकांसाठी वापरला जातो.

पण शनिवारी मात्र शपथग्रहण केल्यापासून पहिल्यांदाच ठाकरे कुटुंब वर्षा बंगल्यावर तीन दिवस वास्तव्यास आले. मातोश्रीबाहेर पडून मुख्यमंत्री आपल्या कुटुंबासमवेत खास वर्षा बंगल्यावर का याचे कारण समजलेले नाही. काही दिवसांपूर्वी वर्षा बंगल्यावर काही अत्यधुनिक सोयी सुविधांबद्दलच्या सुधारणा करण्यात आल्याचे बोलले जाते. त्यानंतर मुख्यमंत्री २८ ते ३० नोव्हेंबर येथे वास्तव्यास असल्याची माहिती आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER