उद्धव ठाकरे दुःशासन, शिवसेना कौरव! वाराणसीत लागले फलक

उत्तर भारतात शिवसेनेविरुद्ध संताप

Kangana Ranaut & Uddhav Thackeray.jpg

वाराणसी : अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) आणि शिवसेना (Shivsena) यांच्यातील वादामुळे उत्तर भारतात अनेक ठिकाणी शिवसेनेविरुद्ध संताप व्यक्त होतो आहे. या संदर्भात – नरेंद्र मोदी श्रीकृष्ण, कंगना द्रौपदी, उद्धव ठाकरे (Uddhav Tackeray) दुःशासन आणि शिवसेना कौरव तर सोनिया गांधी धृतराष्ट्र असे फलक वाराणसीत चौकाचौकात लागले आहेत.

फलकातील चित्रात कंगना आणि शिवसेना यांच्यात सुरू असलेल्या वादाची तुलना महाभारतामधील द्रौपदी वस्त्रहरणाशी करण्यात आली आहे. कंगनाला द्रौपदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दु:शासनाच्या रूपात दाखवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) श्रीकृष्णाच्या रूपात आहेत. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची तुलना धृतराष्ट्राशी करण्यात आली आहे.

वाराणसीमधील वकील श्रीपती मिश्रा यांनी हे फलक लावले आहेत. याबाबत ते म्हणाले – महाराष्ट्र सरकारने कंगनाचे कार्यालय पाडण्याची केलेली कारवाई निंदनीय कृत्य आहे. आम्ही याचा निषेध करतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER