मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार आज पंतप्रधान मोदींची भेट ; अजित पवार ,अशोक चव्हाणही सोबत

CM Uddhav Thackeray-PM Modi.jpg

मुंबई: राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation)मुद्दा चांगलाच पेटला आहे . या प्रश्नी तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (मंगळवारी) दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.

काहीवेळापूर्वीच उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) मातोश्रीवरुन निघाले असून थोड्याचवेळात ते दिल्लीत दाखल होतील. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे हे त्यांच्यासोबत असतील.

उद्धव ठाकरे यांची सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ही बैठक होईल. कोरोनाशी सामना करत असताना राज्य सरकारला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वेळोवेळी पत्र लिहून अनेक मागण्या करण्यात आल्या होत्या. पण आता खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहे. त्यामुळे या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

दरम्यान उद्धव ठाकरे यांनी सोमवारी वर्षा बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी जवळपास तासभर चर्चा केली. या बैठकीत मराठा, ओबीसी, पदोन्नती आरक्षणासह अन्य महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button