उद्धव ठाकरे म्हणजे ‘ मॅटिनी मुख्यमंत्री , वर्षभर मंत्रालयात पाय ठेवला नाही; भाजपचे टीकास्त्र

Maharashtra Today

मुंबई : राज्यात उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) हे मुख्यमंत्री झाल्यापासून विरोधकांनी त्यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षभर मंत्रालयात पाय ठेवलेला नाही. त्यांना हल्ली लोक गमतीने मॅटिनी मुख्यमंत्री म्हणतात, अशी खोचक टीका भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केली.

शिवसेनेच्या खासदारांनी पंतप्रधान मोदींमुळेच पाच वर्षे सत्ता उपभोगली. 18 महिन्याच्या काळात मुख्यमंत्र्यांचा जनसंपर्क किती ? याउलट देवेंद्रजींच्या काळात संपवले. व्हीआयपी कल्चर पुन्हा सुरू केल्याबद्दल तुमच आणि मुख्यमंत्र्यांच कौतुकच, असा टोला विक्रांत पाटील यांनी लगावला आहे. उद्धव ठाकरे यांनी गेल्या वर्षभरात मंत्रालयात पाय ठेवलेल नाही. त्यामुळे लोक उद्धव ठाकरेंना मॅटिनी मुख्यमंत्री म्हणतात, असेही विक्रांत पाटील यांनी म्हटले.

तसेच विक्रांत पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला . उद्धव ठाकरे बोलतात त्याप्रमाणे ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी, हीच त्यांची प्राथमिकता आहे. आदित्यजी आपले बाबा मुख्यमंत्री आहेत. तसेच ‘पुण्यवान’ माणसांची तुम्हाला साथ, तुम्हाला कधीच आर्थिक चणचण भासणार नाही. पण आता तुम्ही मुंबईबाहेरील महाराष्ट्र समजून घेत युवकांची परिस्थिती सावरण्यासाठी बघा. संजय राठोड, अनिल देशमुख आणि आता तुमचे अनिल परब अडचणीत आहेत याचे तुम्हीही साक्षीदार आहात. महाविकासआघाडीत एवढे ‘ प्रताप ‘ सुरू असताना केंद्राकडे बोट दाखवून स्वतच भ्रष्ट राजकारण झाकण्याची धडपड कशासाठी, असा सवाल आदित्य ठाकरे समोर उपस्थित केला .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button