वाझे कोठडीत असल्याने उद्धव ठाकरेंनी वायकरांना १०० कोटींचे टार्गेट दिले – किरीट सोमय्या

Sachin Vaze - Uddhav Thackeray - Ravindra Waikar - Kirit Somaiya

मुंबई :- भाजपाचे (BJP) माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्याविरोधात शिवसेनेचे (Shiv sena) आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) हा दावा करण्यात आला आहे. किरीट सोमय्या यांनी केलेल्या बेजबाबदार वक्तव्यांमुळे आपली प्रतिमा मलिन झाल्याचं रवींद्र वायकर यांनी म्हटलं आहे. अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी किरीट सोमय्यांकडून अशा प्रकारचे आरोप केले जात असल्याचा दावा रवींद्र वायकर यांनी केला आहे. दरम्यान, खटला दाखल करण्यात आल्यानंतर किरीट सोमय्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

किरीट सोमय्या यांनी ट्विट करत ‘सचिन वाझे (Sachin Vaze) जेलमध्ये असल्याने उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) बहुतेक माझ्याकडून १०० कोटी वसूल करायला सांगितलं असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ते म्हणाले आहेत की, “सचिन वाझे जेलमध्ये बंद आहे, त्यामुळे त्याच्याकडून येणारे १०० कोटी मिळणार नाहीत म्हणून बहुतेक उद्धव ठाकरेंनी वायकरांना यावेळी सोमय्यांना नोटीस पाठवून त्यांच्याकडून १०० कोटी वसूल करायला सांगितलं. अशा धमक्यांना आम्ही भीक घालत नाही.” यावेळी त्यांनी ठाकरे सरकारचे, सचिन वाझेसह सगळे घोटाळे बाहेर काढल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असाही इशारा दिला आहे.

तसंच अजून एक ट्विट किरीट सोमय्या यांनी केलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, संजय राऊत यांची शेवटची चेतावणी. प्रताप सरनाईकची १०० कोटींची नोटीस, रवींद्र वायकरचा १०० कोटींचा  दावा, वाह रे ठाकरे सरकार, असे म्हणत त्यांनी टोला लगावला.

ही बातमी पण वाचा : सचिन वाझेच्या हदयात ९० टक्के ब्लॉकेजेस; वकिलांची मागणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button