वर्षा निवासस्थानी बैठक; सचिन वाझे प्रकरणी उद्धव ठाकरे-अजित पवार रणनीती ठरणार

मुंबई :मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार आढळल्याच्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला आहे. एनआयएने (NIA) पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना अटक केली आणि अनेक गोष्टी हळूहळू उलगडू लागल्या आहेत. वाझेंना अटक झाल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. या प्रकरणाचे महाविकास आघाडी सरकारमध्ये पडसाद उमटले आहे. आज दुसऱ्या दिवशी सुद्धा वर्षा बंगल्यावर बैठका सुरूच आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांच्यात महत्त्वाची बैठक सुरू आहे.

सचिन वाझे अटक प्रकरणानंतर महाविकास आघाडी सरकारने तातडीने डॅमेज कंट्रोल सुरू केले आहे. सोमवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन मंत्रिमंडळात खांदेपालट करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारमध्ये आता बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार पोहोचले.

या बैठकीला शिवसेनेचे नेते अनिल परब हे देखील उपस्थितीत आहे. तसंच गृहमंत्री अनिल देशमुख, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित आहेत. सचिन वाझे प्रकरणाबरोबर पोलीस आयुक्त बदली? राज्यातील कोरोना परिस्थिती आणि जळगाव महापालिका याबाबत ही बैठक होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER