शरद पवारांच्या आशीर्वादाने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात सरकार पाच वर्षं पूर्ण करणार; चंद्रकांत खैरे

MVA-Chandrakant Khaire

औरंगाबाद :- कोणी काहीही बोललं तरी काय होणार नाही. शरद पवार यांच्या आशीर्वादाने, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार, अशी विधान शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे  (Chandrakant Khaire)यांनी केले आहे.

औरंगाबादेत राष्ट्रवादीचे पदवीधर उमेदवार सतीश चव्हाण यांच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते .

अर्णब गोस्वामीला तात्पुरता जामीन मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आदर करतो. त्याला किती भोकायचे आहे, तेवढे भोकू द्या, आमच्या सारखे शिवसैनिक महाराष्ट्रात आहेत. आणि त्याला महाराष्ट्रात राहायचं आहे, असा धमकीवजा इशाराही चंद्रकांत खैरेंनी दिला आहे.

तसेच कोणी काहीही बडबड केली तरी फरक पडणार नाही, असं जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले आहेत. कट अनेक आहेत, अनेकांच्या अनेक अपेक्षा आहेत. प्रश्न तातडीने सुटावा, अस संघटनांना वाटत आहे. कोरोनामुळे आर्थिक प्रश्न निर्माण झालेत, प्रश्न सोडवण्याची इच्छा आहे. पण त्याला वेळ लागणार आहे. विरोधी बाजूच्या बद्दल आम्ही बोलत नाही, विरोधी पक्षात उमेदवारावरून भांडाभांड सुरू आहे. भाजपमध्ये सगळं आलबेल आहे, असं नाही. काल फडणवीस म्हणाले आपलं सरकार येणार आहे, दर तीन महिन्यांनी फडणवीसांनी अस सांगितल्याशिवाय त्यांचं सैन्य त्यांच्यासोबत राहत नाही. आपलं सरकार येईल, असे वर्षभर ते सांगत राहिले, आपण पुढचे चार वर्षे पूर्ण करू, असा विश्वासही जयंत पाटलांनी बोलून दाखवला आहे.

दरम्यान या कार्यक्रमाला या कार्यक्रमाला जयंत पाटील, चंद्रकांत खैरे, धनंजय मुंडे, राजेश टोपे उपस्थित होते .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER