नक्कीच काहीतरी गडबड आहे; उद्धव ठाकरे दबावाखाली आहेत- चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil-Uddhav Thackeray

मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासूनच भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निशाणा केल्याचे दिसून येते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असले तरी महाराष्ट्राचे सरकार मात्र ते चालवत नाहीत, हे विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आतापर्यंत अनेकदा केले आहे. काल आझाद मैदानावरील धरणे आंदोलनादरम्यान केलेल्या भाषणातही पाटील यांनी हे विधान करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका टिप्पणी केली.

महाराष्ट्राचं सरकार विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चालवत नाहीत. ठाकरेंबाबत नक्कीच काहीतरी गडबड आहे. उद्धव ठाकरे इतके कपटी नाहीत, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. आज ज्या पद्धतीने गेल्या सरकारची कामे रोखण्यात येत आहेत, कामांचा तपास केला जात आहे… त्यावरून असं दिसतंय की, उद्धव ठाकरे दबावाखाली आहेत, असं धक्कादायक वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. तसेच, स्वातंत्र्यवीर सावरकरांसाठी ठोस भूमिका घेऊ शकत नसणा-या शिवसेनेवर पाटील यांनी टीका केली.

गेल्या अनेक दिवसांपासून स्वातंत्र्यवीर सावरकरांवरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर पाटील म्हणाले, ‘महात्मा गांधींनी जर ‘अहिंसे’च्या माध्यमातून स्वातंत्र्य मिळवून दिले तर स्वातंत्र्यवीर सावरकर ‘क्रांती’च्या माध्यमातून स्वातंत्र्यासाठी लढले. स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या क्रांतिकारकांना प्रशिक्षण देण्यासाठी सावकरांचे मोठे योगदान राहिले आहे. उद्धव ठाकरेंचे सरकार जर सावरकरांच्या मुद्द्यावर विरोध करत असेल वा या कारणाने सदन सोडतील तर त्यांचा अजेंडा लक्षात येईल. शिवसेना ही सावरकरांच्या मुद्द्यावर इतकी लाचारी का पत्करत आहे, असा सवाल पाटील यांनी यावेळी उपस्थित केला.

भाजपाकडून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न; आज सावरकरांचा गौरव ठराव मांडणार