
दिल्ली :- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हेच सचिन वाझेंचे गॉडफादर आहेत. या सर्व प्रकरणाला मुख्यमंत्रीच जबाबदार असून त्यांना एक दिवसही खुर्चीवर राहण्याचा अधिकार नाही, असा मोठा आरोप भाजपाचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी संसद भवन परिसरात माध्यमांशी बोलताना केला.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या राजीनाम्याआधी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही नारायण राणे यांनी यावेळी केली आहे.
उद्धव ठाकरेंना वर्षभर चांगले काम करता आले नाही. सुशांतसिंह राजपूत, दिशा सालियन, पूजा चव्हाण आणि मनसुख हिरेन यांच्या हत्या झाल्या. यातील बहुतेक प्रकरणे वाझेंकडे देण्यात आली होती. संबंध नसतानाही वाझेंकडे ही प्रकरने का देण्यात आली, असा प्रश्न नारायण राणे यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी सचिन वाझेंकडून सर्व कामे करुन घेतली, असा दावा देखील नारायण राणे यांनी केला.
सचिन वाझे आधी सस्पेंड होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना डिपार्टमेंटमध्ये घेतले. तसेच त्यांच्याकडे क्राईम इंटेलिजन्स यूनिटची जबाबदारीही दिली. केवळ मुख्यमंत्र्यांमुळेच वाझे पोलीस दलात परत आले. यावरून, मुख्यमंत्री हेच वाझेंचे गॉडफादर असल्याचं दिसते, असे राणे म्हणाले.
ही बातमी पण वाचा : वाझेचे झेंगट : हे तर सत्ता प्रायोजित हफ्ता वसुली कांड; काँग्रेसने शिवसेनेला सोलले
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला