
मुंबई : भविष्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) देशाचे पंतप्रधान होतील, असे भाकीत शिवसेनेचे नेते व प्रवक्ते संजय राऊत यांनी नुकतेच वर्तवले. यावर ठाकरे यांची टिंगल करताना भाजपाचे नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ट्विट केले – उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान होण्यासारखे दुसरे दुर्भाग्य नाही.
ट्विटमध्ये राणे म्हणालेत – उद्धव ठाकरे आपल्या देशाचे पंतप्रधान होण्यासारखं दुर्भाग्य दुसरं नाही. एक शहर सांभाळू शकत नाही. कुबड्यांवर सरकार चालत आहे. तसेच उद्धव ठाकरे पंतप्रधान झाले तर, फेस मास्क देशाचा नवीन झेंडा करेल आणि देशाचे वाटोळे करेल. उद्धव ठाकरे अकार्यक्षम आहेत, असे सूचित करताना निलेश राणे यांनी दुसरे ट्विट केले, ठाकरे सरकारने महाराष्ट्रात प्रत्येक विभागाचे नुकसान केले आहे.
शेती, शिक्षण, आरोग्य, नगर विकास, गृहनिर्माण, कायदा-सुव्यवस्था, महिलांवरचे अत्याचार ह्या सगळ्या विषयात महाराष्ट्र सरकार अपयशी ठरले आहे तरीही संज्या राऊत निर्लज्जासारखा म्हणतो – सेनाभवन राजकीय भूकंपाचे केंद्र होणार!
ही बातमी पण वाचा : पवारसाहेबांनी हे ‘कॅरॅक्टर’ बाहेर काढल्यापासून लोक राहुल गांधीला विसरले; निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोमणा
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला