उद्धवजी माझ्या मोठ्या भावासारखे आहेत, ते नवे आहेत; मात्र ही वेळ कठोर निर्णयाची आहे – फडणवीस

fadnavis-uddhav thackeray

मुंबई :- महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. कोरोनाची स्थिती हाताळण्याकरिता महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांमध्ये समन्वय नाही. या वेळी राजकारण बाजूला ठेवून एकजुटीने महाराष्ट्राला कोरोनापासून वाचवण्याची गरज आहे. कोरोनामुळे देशात होणाऱ्या मृत्यूंपैकी ४१ टक्के मृत्यू एकट्या महाराष्ट्रात झाले आहेत. रोज ही संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत केवळ आकड्यांची हेरफेर करण्याचे काम होऊ नये.

ही वेळ राजकारण करण्याची नाही. राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्राला कोरोनाच्या दलदलीतून बाहेर काढणे अधिक गरजेचे आहे. पण अशा परिस्थितीत कोरोनाचा सामना करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उलण्याऐवजी सरकार आकड्यांची फेकाफेक करत असेल तर कुठे तरी आम्हाला सरकारला नक्कीच आरसा दाखवावा लागेल- अशा तीव्र शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या कारभारावर बोट ठेवले आहे. ते म्हणाले, सरकारला सांगावं लागेल की, कोरोनाविरोधात लढाई सुरू आहे. त्या दृष्टीने योग्य कारवाई करा.

काल एका दिवसात आठ हजार रुग्ण डिस्चार्ज झाल्याचे दाखवले आणि डिस्चार्ज रेट वाढवण्याचा प्रयत्न केला गेला, अशी टीकाही देवेंद्र फडणवीसांनी सरकारवर केली.

तसेच या सरकारला कोरोनावर चर्चा नको आहे, त्यांना राष्ट्रपती राजवटीची चर्चा करून कोरोना परिस्थितीकडे दुर्लक्ष हवं आहे, असेही फडणवीस म्हणाले.

फडणवीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल बोलताना म्हणाले, उद्धवजी माझे मित्र, माझ्या मोठ्या भावासारखे आहेत, ते नवे आहेत, त्यांना शिकण्यासाठी काही महिने हवे ते आम्ही दिले; मात्र या परिस्थितीत कठोर निर्णय आवश्यक आहे, ते घेताना दिसत नाहीत. देवेंद्र फडणवीस टीव्ही-९ मराठीच्या मुलाखतीत बोलत होते.

मुलाखतीतील ठळक महत्त्वाचे मुद्दे :

उद्धवजी माझ्या मोठ्या भावासारखे, त्यांना अपयशी ठरले म्हणणार नाही : देवेंद्र फडणवीस

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. कोरोनामुळे देशात होणाऱ्या मृत्यूंपैकी ४१ टक्के मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. रोज ही संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत केवळ आकड्यांची हेरफेर करायची. काल एका दिवसात आठ हजार रुग्ण डिस्चार्ज झाल्याचं दाखवलं आणि डिस्चार्ज रेट वाढवण्याचा प्रयत्न केला गेला, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी सरकारवर केली. टीव्ही-९  मराठीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी ही टीका केली.

“लोक डिस्चार्ज होत असतील याचा आम्हाला आनंद आहे. लोक चांगले झालेच पाहिजेत. पण, नंबर गेम करण्यापेक्षा आज मुंबईतील लोकांना बेड्स, ऑक्सिजन आणि रुग्णवाहिकादेखील मिळत नाही, रस्त्यावर लोकांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे यासंदर्भात कारवाई होणं अपेक्षित आहे.” अशी मागणी देवेंद्र फडणवीसांनी केली.

ही बातमी पण वाचा : आमचा नारा ‘सरकार भगाओ’ नसून ‘ सरकार जगाओ’ होता : फडणवीसांचा आदित्य ठाकरेंना टोला

राजकारण बाजूला ठेवा, ही राजकारणाची वेळदेखील नाही. पण अशा परस्थितीत कोरोनाचा सामना करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उलण्याऐवजी सरकार आकड्यांची फेकाफेक करत असेल तर कुठे तरी आम्हाला सरकारला नक्कीच आरसा दाखवावा लागेल. सरकारला सांगावं लागेल की, कोरोनाविरोधात लढाई सुरू आहे. त्यादृष्टीने योग्य कारवाई करा, असेही फडणवीस म्हणाले.

केंद्राकडून किती आणि काय मिळालं आहे याची माहिती आशिष शेलारांनी दिली आहे. या सरकारला कोरोनाची चर्चा नको आहे, त्यांना माहिताय की यामध्ये आपण अपयशी ठरलो आहे.

या सरकारला कोरोनावर चर्चा नको आहे, त्यांना राष्ट्रपती राजवटीची चर्चा करून कोरोना परिस्थितीकडे दुर्लक्ष हवं आहे. आम्ही सरकार पाडण्याचा प्रयत्न करणार नाही, आता वेळ नाही, हे सरकार अंतर्विरोधाने पडेल, ही राजकारणाची वेळ नाही.

धमक्यांना आम्ही भीक घालत नाही, संजय राऊत सकाळी वेगळं लिहितात, संध्याकाळी वेगळं लिहितात, आमचं सोडा, अपक्षही इकडे तिकडे होणार नाहीत, तुम्ही तुमचं बघा, तुमचा पक्ष सांभाळा.

आम्ही सरकारला पूर्ण पाठिंबा देऊ, ते म्हणतील तसे करू, फक्त सरकारने बनवाबनवी सोडावी. पत्रकारांवर दबाव आणला जात आहे, ट्रोल गँग तयार करून विरोधकांवर आक्षेपार्ह टीका करण्यात येत आहे, फेक अकाउंटवरून काहीही केलं तरी सत्य जनतेपर्यंत पोहचतं. आज महाराष्ट्रात संतापाची लाट आहे.  असा संताप मी यापूर्वी पाहिला नाही.

माझी दूरदृष्टी चांगली आहे, उद्धवजींबद्दल चांगलं बोलत असतील तर चांगलं आहे, मला त्यांच्याबद्दल असूया नाही, जे सेलिब्रिटी आधी बोलत होते, ते आता गप्प का आहेत?

पृथ्वीराज चव्हाण, राहुल गांधी यांनीही उद्धव ठाकरेंकडे बोट दाखवलं. मला आताच्या क्षणी उद्धवजींवर टीका करायची नाही. कुठल्या वेळी काय बोलायचं आणि काय नाही हे मला कळतंय.

उद्धवजी माझे मित्र, माझ्या मोठ्या भावासारखे आहेत, ते नवे आहेत.  त्यांना शिकण्यासाठी काही महिने हवे ते आम्ही दिले; मात्र या परिस्थितीत कठोर निर्णयाची आवश्यक आहे, ते घेताना दिसत नाहीत.

सरकारचं अस्तित्व कुठे आहे? अधिकारी सरकार चालवत आहेत, राजकीय नेतृत्वाने मोठे निर्णय घ्यावे लागतात; मात्र ते दिसत नाहीत, त्यांचे सहकारी दोन्ही पक्ष जबाबदारी झटकत आहेत.

ICMR ने स्पाईक येईल असं म्हटलं; पण किती रुग्ण होतील याचे आकडे सांगितले नव्हते.

वरळी पॅटर्न असा काहीच नव्हता, ICMR ने असं काही म्हटलं नाही, केवळ बातम्यांमधूनच ते समोर आणण्यात आलं.  लॉकडाऊनचं पालन तंतोतंत झालं नाही.  मार्च आणि एप्रिलमध्ये तीन कोटी रेशनधारकांना रेशन मिळालं नाही.  पुरवठ्याचं विकेंद्रीकरण झालं नाही.  रुग्णालयांचा डॅशबोर्ड सुरुवातीला करता आला असता.

धारावीसारख्या ठिकाणी रुग्णांच्या संपर्कातील किंवा त्या भागातील प्रत्येकाची टेस्ट आवश्यक होती; मात्र बीएमसीने नियम बदलल्याने रुग्णांची संख्या वाढली.

मुंबईत केवळ धारावी, वरळीत रुग्ण वाढले नाहीत. प्रत्येक वॉर्डमध्ये रुग्ण आहेत, सोसायट्यांमध्ये रुग्ण वाढलेत, धारावीसारख्या ठिकाणी जास्तीत जास्त संस्थात्मक क्वारंटाईन गरजेचं होतं.

महाराष्ट्रात ३२ टक्के पॉझिटिव्ह केसेस येत आहेत. त्यामुळे टेस्टचं प्रमाण वाढवायला हवं; मात्र यांनी अनेकांना सोडून दिले.  प्रतिकारशक्तीने जगले तर जगतील, नाही तर मरतील.  सरकारने बनवाबनवी न करता उपाय शोधायला हवे.  सरकार आकड्यांची फेकाफेकी करत असेल तर त्यांना आरसा दाखवायलाच हवा.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER