राम मंदिर बांधणार म्हणजे बांधणारच – उद्धव ठाकरे

Uddhav

पंढरपुर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या  पंढरपुरातील भुतो न भविष्यती सभेला सुरूवात झाली असून, सभेला उपस्थित जनसागराला संबोधीत करताना उद्धव ठाकरे म्हणाले,  राम मंदिर बांधल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.  राम मंदिर बांधणार म्हणजे बांधणारच.    असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.    मी, माझ्या तमाम हिंदू जनतेला घेवून मी येथे आलो आहे, कुंभकर्णाला जागा करण्यासाठी आलो आहे. कुंभकर्ण झोपून राहिला, तो उठलाच नाही तर पेटलेला हिंदू कुंभकर्णा तुझी जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणुनच यापुढेही मी संपुर्ण भारत फिरेन पण अयोध्येला कुंभकर्णाला जागं करण्यासाठीच गेलो होतो. पण,

पंढरपुरचा विठ्ठूराया हा सर्व गोरगरीब शिवसैनीकांचा, सामान्यांचा देव आहे. असे ठाकरे यावेळी म्हणाले.
पंतप्रधान मोदींवर निशाणा साधताना म्हणाले, पंतप्रधानांना सांगायचाय, जगभर फिरताय एकदा आमच्या दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात येऊन जा. शेतकरी बांधवाच्या डोळ्यातले अश्रू एकदा बघा असे जाहीर आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले. तसेच, जानेवारीमध्ये संपूर्ण दुष्काळग्रस्त महाराष्ट्र मी पिंजून काढणार आहे. शेतक-यांच्या डोळ्यात अश्रू असताना शिवसैनीकांना हसू येवू शकत नाही.
महाराष्ट्रात दुष्काळाने शेतकरी होरपळत असताना त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ज्या कडुंलिबाने कीड मारत होतो, त्यालाच कीड लागली आहे, असं एका शेतकऱ्याने सांगितलं एवढा दुष्काळ महाराष्ट्रात आहे.  तसेच, मला सभेपूर्वी सांगितलं की या मैदानात सभा घेण्याचं धाडस कोणी करत नाही, तेव्हाच मी ठरवलं की सभा घ्यायची ती याच मैदानात. आणि आज अलोट गर्दीला मी संबोधीत करत आहे. हे माझ्या शिवसैनिकांचं माझ्यावरचं प्रेम आहे.
शिवसेनेचे प्रमुक उद्धव ठाकरे पंढरपुरात लोखोंच्या जनसमुदायाला संबोधीत करताना बोलत आहे.
सभा सुरू आहे… या सभेला अलोट गर्दी उसळलेली आहे.
विविध मुद्द्यांसह सविस्तर बातमी लवकरच…