राम मंदिरासाठी उद्धव ठाकरे आग्रही; खासदारांसह अयोध्येला जाणार

Ram Mandir-Uddhav

मुंबई :- शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्यावरून नेहमीच आक्रमक भूमिका घेताना दिसत असते. रामराज्य देशात यावे यासाठी शिवसेनेने नेहमीच आग्रही भूमिका घेतली आहे. लोकसभा निवडणुकीतील यशानंतर आता पुन्हा शिवसेना अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी आग्रही होताना दिसत आहे.

निवडणुकीआधी केलेल्या अयोध्या दौऱ्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नवनिर्वाचित खासदारांसह पुन्हा अयोध्यावारी करणार आहेत. अयोध्येत जाऊन १५ जूनला शनिवारी शिवसेनेचे खासदार रामलल्लाचं दर्शन घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर नवनिर्वाचित शिवसेना खासदारांनी एकवीरादेवीचे दर्शन घेतले. कोल्हापूरमध्ये जाऊन अंबाबाईचे आशीर्वाद घेतले. यानंतर आता शिवसेनेने आपला मोर्चा अयोध्येकडे वळवला आहे. उद्धव ठाकरे १५ जूनला अयोध्येत जाऊन शिवसेनेच्या सर्व विजयी खासदारांसह रामलल्लाचं दर्शन घेणार आहे.

ही बातमी पण वाचा : कश्मीरचे पुन्हा नंदनवन बनो! – उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांनी नोव्हेंबरमध्ये सहकुटुंब रामलल्लाचं दर्शन घेतलं होतं. पुन्हा एकदा राम मंदिर प्रश्न धसास लावण्यासाठी शंख फुंकणार असल्याचं शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितलं आहे. यावेळी राम मंदिराच्या निर्मितीसाठी जर अध्यादेश आणला तर शिवसेना सरकारला पाठिंबा देईल, असंही उद्धव ठाकरे म्हणाले होते.