उद्धव ठाकरे, कायदा-व्यवस्था सांभाळू शकत नसाल तर राजीनामा द्या – मदन शर्मा

Madan Sharma & Uddhav Thackeray

मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे व्यंगचित्र ‘फॉरवर्ड’ केले म्हणून माजी नौदल अधिकारी मदन शर्मा (Madan Sharma) यांना शुक्रवारी शिवसैनिकांनी मारहाण केली. शर्मा यांना आता रुग्णालयातून सुटी मिळाली. रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना शर्मा मुख्यमंत्र्यांना उद्देशून म्हणाले – उद्धव ठाकरे, कायदा-व्यवस्था सांभाळू शकत नसाल तर राजीनामा द्या.

याबातच्या ट्विटमध्ये ते म्हणाले – मी जखमी आहे, तणावाखाली सुद्धा आहे. जे काही घडले, ते दु:खद आहे. उद्धव ठाकरे तुम्ही कायदा-व्यवस्था सांभाळू शकत नसाल, तर राजीनामा द्या.

दुसऱ्या ट्विटमध्ये शर्मा म्हणतात – मला, माझ्या मुलांना, कुटुंबाला त्यांच्या (शिवसैनिकां)पासून धोका आहे. म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मी विनंती करतो, माझ्या कुटुंबाला संरक्षण द्या.

उद्धव ठाकरे यांनी माफी मागावी, अशी मागणी करताना तिसऱ्या ट्विटमध्ये मदन शर्मा म्हणाले – उद्धव ठाकरे यांच्या संघटनेने आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे. पुन्हा कोणाबाबत अशी घटना घडता कामा नये.

शर्मा याना झालेल्या मारहाणीबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, माजी सैन्य अधिकाऱ्यांवर हल्ला होणे, खेदजनक आहे. हे अजिबात मान्य नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER