बाळासाहेबांच्या चाहत्याला उद्धव ठाकरेंनी दिले मंत्रिपदाचे गिफ्ट

Uddhav Thackeray-bacchu kadu

मुंबई :- अमरावती जिल्ह्यातील अचलपूर विधानसभा मतदार संघाचे आमदार ओमप्रकाश बाबाराव कडू उर्फ बच्चुभाऊ कडू यांनी आज महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. शेतकरी कुटुंबातील बच्चू कडू हे प्रहार संघटनेच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांना लावून धरतात. त्यांनी पहिली निवडणूक ही लोकांकडून पैसे गोळा करून लढवली होती. त्यांचे राजकारण हे काहीसे बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकारणाशी मिळते जुळते आहे. बच्चू कडू हे तरुणपणी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारापासून खूपच प्रभावित झाले होते. बाळासाहेब ठाकरे त्यांचे आदर्श होते.

महाराष्ट्रात पहिल्यांदाच बाप आणि मुलगा एकाच मंत्रिमंडळात काम करणार

१९९७ साली बच्चू भाऊ हे पहिल्यांदाच पंचायत समिती सदस्य निवडून आले होते. त्यानंतर २००४ साली पहिल्यांदा बच्चू कडू आमदार म्ह्णून निवडून आले. ही त्यांची चौथी टर्म आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी त्यांची स्टाईल ही अनेक नोकर शहांना धडकी भरवणारी ठरली आहे. त्यांनी एम.पी.एस.सी.च्या विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न सोडवण्यात महत्वाची भूमिका निभावली. आमदार असूनही अगदी साधे राहणीमान मतदार संघातील जनतेला आकर्षित करते. त्यांनी शिवसेनेला पाठींबा दिला आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रिपद दिले आहे.