सरकार कधी पडणार हे उद्धव ठाकरेंना कळणारही नाही, रामदास आठवलेंचा टोला

Uddhav Thackeray-Ramdas Athawale

मुंबई :- शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्यातील सरकार पडले तर अराजकता पसरेल असे विधान केले आहे. यावर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले (Ramdas Athwale) यांनी भाष्य केले आहे . हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच २५-३० वर्षे शिवसेना (Shiv Sena) आणि भाजपची (BJP) युती होती. मग, आता अचानक शिवसेनेचे हिंदुत्व वेगळे कसे बनले, असा प्रश्न उपस्थित करतानाच राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) आम्ही पाडणार नाही. पण, हे सरकार कधी पडणार हे उद्धव ठाकरे यांना कळणारही नाही, असे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले म्हणाले.

उद्धव ठाकरेंच्या मताशी मी सहमत नाही. सरकार स्वतःच पडेल आणि वेगळाच इतिहास घडेल, महाविकास आघाडी पराभूत ठरेल. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे एक दिवस भूकंप होईल, असे आठवले म्हणाले. मुंबई पाकव्याप्त काश्मीरच्या कंगनाच्या भूमिकेचा आम्ही विरोधच केला. परंतु, मुंबईत तिला येऊ देणार नाही या घटनाविरोधी भूमिकेला विरोध दर्शवत त्याबाबत कंगनाला पाठिंबा दिला. आज बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) असते तर कंगना त्यांना भेटली असती तर ताबडतोब हा विषय मिटला असता, असे आठवले म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER