उद्धव ठाकरेंनी योगी आदित्यनाथांचे अभिनंदनही केले नाही ; आशिष शेलारांची टीका

मुंबई : उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी आग्रा येथील मुघल संग्रहालयाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर त्यांच्यावर सर्व स्तरांवरून कौतुक करण्यात आले . यावरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे.

;

आशिष शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटले की, “ताजमहालच्या शेजारी उभारण्यात येणाऱ्या मुघल संग्रहालयाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचा निर्णय उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला. त्यामुळे आग्र्याला महाराजांच्या प्रेरणादायी इतिहासाचा भगवा झेंडा फडकणार.” आशिष शेलार यांनी निर्णयाबद्दल योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन केले आहे.

“खंत एवढीच… महाराष्ट्र शासनाने अथवा मुख्यमंत्र्यांनी, अस्मितेचे धडे देणाऱ्या पत्रपंडितानी योगी आदित्यनाथ यांचे ना अभिनंदन केले, ना या निर्णयाची साधी दखल घेतली. तशी अपेक्षा करणे चुकीचे म्हणा. इथे छत्रपतींच्या वंशजाकडे पुरावे मागितले जातात,तिथे अपेक्षा काय करावी?” असा टोला आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER