ते ‘थोरात’ तर आम्ही जोरात : उद्धव ठाकरे

balasaheb thorat-Uddhav Thackeray

अहमदनगर : विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसात होईल. त्यामुळे प्रचाराला राज्यात वेग आला आहे. नेत्यांच्या एकमेकांवरील टीका टीप्पणीनंही जोर धरला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज अहमदनगरमधील संगमनेरमध्ये आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी सभेला संबोधित करताना ठाकरेंनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षावर त्यांच्याच गावातून तोफ डागली.

ही बातमी पण वाचा:- आता शरद पवारांसह विरोधक बेकार झालेत : उद्धव ठाकरे 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांचे नेते बँकॉकला गेले आहेत, त्यामुळे त्यांनी आता घरी जायला हरकत नाही. ते थोरात असतील तर आम्ही जोरात आहोत, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी थोरात यांच्यावर टीका केली. काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदेंनी देखील आता आम्ही थकलो आहोत अशी कबुली दिली आहे, असेही ते यावेळी म्हणाले. संगमनेरमध्ये साहेबराव नवले यांच्या प्रचार सभेत उद्धव ठाकरे बोलत होते.

पूढे बोलताना ठाकरे म्हणाले, आमच्याकडे आता सगळं हाऊसफुल्ल झालंय. सर्व चांगले लोक आमच्याकडे आले आहेत. धगधगते निखारे आज आमच्यासोबत आले आहेत त्यामुळे तुमचा विस्तवं पेटतोय का ते बघा. जे काही तुमचे पाच दहा निवडून येतील ते तरी आमचं सरकार आल्यानंतर तुमच्यात राहतील का? याचा विचार करा, असं होणार असेल तर मग कशाला त्यांना मतं द्यायची. ही तुमच्या भविष्याची निवडणूक आहे त्यामुळे विचारपूर्वक मतदान करा, असे आवाहन यावेळी उद्धव ठाकरेंनी केले.