उद्धव ठाकरेंनी बेनामी मालमत्तेची माहिती लपवली; किरीट सोमय्यांचा आरोप

Kirit Somaiya - Uddhav Thackeray

मुंबई :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या वेळी सादर केलेल्या संपत्तीबाबतच्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या बेनामी संपत्तीची माहिती लपवली आहे. यासंदर्भात मी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे, असे भाजपाचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) म्हणालेत. सोमय्या यांनी आरोप केला की, अन्वय नाईक आणि ठाकरे कुटुंबाचे आर्थिक संबंध आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांची २३ हजार ५०० चौरस फुटांची १९ घरं आहेत. ही एकूण ५.२९ कोटींची बेनामी मालमत्ता आहे.

महाकाली : ९९९ वर्षांच्या मुदतीचे करारपत्र दाखवा

महाकाली जमीन कराराबाबत किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. इंग्रजांच्या काळातील ९९ वर्षे  करारावर देण्यात आलेल्या जमिनीचा करार ९९९ वर्षे  करण्यात आला! महाकाली मातेला विकण्यासाठी आणि या गुफा बिल्डर्सला दान करण्यासाठी ही कालमर्यादा ९९९ वर्षे केली, असे सांगितले. याबाबतचे सर्व पुरावे आहेत. तिथे जाण्याचा रस्ताही आमचाच आहे असे ते म्हणत आहेत.

शरद पवारांचे (Sharad Pawar) जवळचे आणि ठाकरे परिवारांचे मित्र शाहिद बालवा, अविनाश भोसले, विनोद गोयंका यांच्यावर ठाकरे सरकार मेहेरबान आहेत, असे सोमय्या म्हणालेत. शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांच्या पत्रावरून महापालिकेने २०० कोटी रुपयांचे ‘टीडीआर’ दिले आहेत. ठाकरे सरकारने हायकोर्ट, पुरातत्त्व  विभाग आणि महापालिकेचा निर्णय बाजूला सारत २०० कोटी रुपयांचे ‘डेव्हलपमेंट राईट्स’ त्यांचा बिल्डर्स मित्रांना दिले आहेत. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या आदेशाने २०० कोटी रुपयांचा फायदा बिल्डर्सला दिला जात आहे. या बिल्डर्सला देण्यात आलेले  ९९९ वर्षांचे करारपत्र दाखवाच, असे माझे मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे, असे किरीट सोमय्या म्हणालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER