लॉकडाऊन नको असेल तर नियम पाळा, मुख्यमंत्र्यांचा आठ दिवसांचा जनतेला अल्टिमेटम

CM Uddhav Thackeray

मुंबई : राज्यातील कोरोनाचा (Corona) संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. मुंबई, पुणे, नाशिकसह विदर्भातील शहरांमध्येही दररोज करोनाचे मोठ्यासंख्येने रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाउन (Lockdown) सुरू होतो की काय? अशी भीती सर्वसामान्यांच्या मनात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला.

आपल्या राज्यात पुन्हा एकदा करोना डोकं वार काढतोय. करोनाची लाट पुन्हा आपल्या राज्यात आली की नाही हे पुढील आठ–पंधरा दिवसात कळेल. मात्र आता थोडंसं बंधन तुमच्यावर आणणं गरजेचं आहे. त्यानुसार उद्यापासून नियमपाळा. लॉकडाऊन करणे हितकारक नाही. त्यामुळे तुम्हाला लॉकडाऊन नको असेल तर नियम पाळा. पुढचे आठ दिवस मी परिस्थितीती बघून निर्णय घेईल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.

राज्यात आतापर्यंत 9 लाख लोकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. माझं कोविड योद्ध्यांना आवाहन आहे की त्यांनी लवकरात लवकर लस टोचून घ्यावी. आता बाकीच्यांना प्रश्न पडला असेल की आम्हाला लस कधी मिळणार? यावर मी म्हणेण की ते वरच्याच्या हातात आहे. म्हणजे केंद्राच्या निर्णयावर आहे. दरम्यान, कोरोना विरोधात आपला मास्क हेच आपलं मुख्य शस्त्र असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे म्हणाले, कोरोना आता पुन्हा डोकं वर काढतो आहे. आपण थोडं फिरायला लागलो. लग्नावरची बंधनं अजूनही आहेत. हे उघडा ते उघडा म्हणणारे कोरोनाची शिस्त मोडू शकत नाही. समजुतदारपणे सुचनांचं पालन करा. सगळ्यांना वाटलं कोरोना गेला, पण तसं नाहीये. कोरोनाची लाट खाली जाते, वर जाते पण खाली जाते त्याच वेळेस या लाटेला थांबवायचं असतं.

उद्यापासून काही जिल्ह्यात लॉकडाऊन?

विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आजच राज्यात सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक, यात्रा, आंदोलनं, मोर्चे यावर पूर्णपणे बंदी घालत असल्याची घोषणा केली आहे. सोबतच जिथं गरज असेल तिथं बंधनं घालणं किंवा लॉकडाऊन जाहीर करण्याची सुचनाही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना केली आहे. अमरावती, यवतमाळमध्ये कोरोनाची स्थिती गंभीर होत असल्याचं ठाकरे म्हणाले. त्यानंतर तिथं लॉकडाऊन करायचा असेल तर अधिकाऱ्यांनी अचानक घोषणा न करता जनतेला चोवीस तास द्यावेत असंही म्हणाले. अचानक घोषीत केलेला लॉकडाऊन हा घातक असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळेच उद्या रात्रीपासून काही जिल्ह्यात लॉकडाऊन किंवा तशा स्वरुपाची काही कडक बंधनं लादली जाऊ शकतात. विशेषत: विदर्भात जिथं स्थिती गंभीर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER