
मुंबई : महाराष्ट्रात मला सुरक्षित वाटते. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यामुळे माझी शिवसेनेबद्दलची (Shiv Sena) मतेही बदलली, असे हिंदी चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपने (Anurag Kashyap) म्हटले आहे. यावर भाजपाचे (BJP) नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसैनिकांना टोमणा मारला, ‘ही तर बाळासाहेबांची बदनामी आहे!’
निलेश राणे यांनी म्हटले आहे की – उद्धव ठाकरे यांच्यामुळे शिवसेनेबद्दलची मते बदलली, हे अनुराग कश्यप याचे म्हणणे म्हणजे, बाळासाहेबांच्या नंतर शिवसेनेत असे काही बदलले जे आधी लोकांना मान्य नव्हते ! म्हणजे बाळासाहेबांच्या (Balasaheb Thackeray) शिवसेनेबाबत अनुराग कश्यपची मते वेगळी होती? ही सरळ सरळ बाळासाहेबांची बदनामी आहे.
एका मुलाखतीत बोलताना अनुराग म्हणाला, मी कोणाचीही बाजू घेत नाही. पण मला महाराष्ट्रात खरंच फार सुरक्षित वाटते. येथे मी खुलेपणाने माझे मत मांडू शकतो. गेल्या काही काळापासून ज्या गोष्टी घडत आहेत, त्या पाहून शिवसेनेबद्दलची माझी मतं पूर्णपणे बदलली आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे हे घडले आहे. मी उद्धव ठाकरे यांच्या मतांशी सहमत नसेलही; पण मला महाराष्ट्रात कायम सुरक्षित वाटते. सध्या केंद्र सरकार लोकांचे लक्ष खऱ्या मुद्द्यांवरून बॉलिवूडकडे (Bollywood) केंद्रित करत आहे. मी काँग्रेस (Congress) समर्थक नाही; पण सध्या सरकार ज्या पद्धतीने काम करते आहे, त्याचा विरोध मी करतो
अनुरागने मांडलेल्या भूमिकेचा हवाला देत नितेश राणे यांनी टोमणा मारला आहे – “उद्धव ठाकरेंमुळे शिवसेनेबाबतची मतं बदलली? म्हणजे बाळासाहेबांच्या शिवसेनेबाबत अनुराग कश्यपची मतं वेगळी होती? ही सरळ सरळ बाळासाहेबांची बदनामी आहे. हे सगळं बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी निमूटपणे ऐकून घ्यायचं?”
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला