खुर्चीसाठी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचारचं गाडून टाकले, निलेश राणेंची विखारी टीका

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘लोकसत्ता’च्या ‘दृष्टी आणि कोन’ या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्रीपदावर बसण्याची आपली भूमिका स्पष्ट केली. “मुख्यमंत्रीपदाची खुर्ची हे माझं स्वप्न कधीच नव्हतं, पण मुलाचं कर्तव्य आणि बाळासाहेब ठाकरेंना दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी मी खुर्चीवर बसलो आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. या विधानावरुन भाजपा नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर विखारी टीका केली आहे.

उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलेली भूमिका हे नाटक असल्याची टीका निलेश राणे यांनी या ट्वीटमध्ये केली आहे. काय नाटक आहे. प्रॉपर्टीसाठी भाऊ कोर्टात आहे. कसलं कर्तव्य आणि कसलं काय. साहेबांनी (बाळासाहेब ठाकरे) सांगितलं होतं की काँग्रेसला कायमचा गाडून टाका. उद्धव ठाकरेंनी खुर्चीसाठी स्व. बाळासाहेब ठाकरेंचे विचारच गाडून टाकले, असं ट्विट निलेश राणे यांनी केले आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button