
मुंबई : राज्यात कोरोनाचा धोका अधिकच वाढत चालला आहे. त्यामुळे ऑफिसमधील कामाच्या वेळेत बदल करणे गरजेचे आहे. वर्क फ्रॉम होम करायला हवं. यामुळे कारण नसताना होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळवता येईल. असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले. मुख्यमंत्र्यांनी आज सात जनतेशी संवाद साधताना याबाबतचे विधान केले. महाराष्ट्रात लॉकडाऊन करायचा का? असा सवालही उद्धव ठाकरेंनी जनतेला विचारला आहे.
काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली निती आयोगाची बैठक पार पडली. यात मी एक सूचना केली होती. यात ऑफिसच्या वेळा विभागणे ही महत्त्वाची सूचना होती. दिवसभरात 24 तास असतात, जर त्या 24 तासाची विभागणी केली. ज्यांना ऑफिसमध्ये येण्याची आवश्यकता नाही, त्यांच्यासाठी वर्क फॉर्म होम केलं. त्यातही आपण तुकड्या केल्या पाहिजेत. यात एक टीम ऑफिसला येईल, दुसरी बॅच वर्क फॉर्म होम करेल, असे आलटून पालटून केले. तर कारण नसताना होणारी गर्दी नियंत्रणात ठेवू शकतो. वर्क फॉर्म होम आहे. ऑफिसच्या वेळा विभागणी करा. त्याचसोबतच त्रिसूत्री पाळा, असे उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा नमूद केले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला