सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी आमचा विश्वासघात केला; भाजपाध्यक्ष नड्डा यांचा सेनेवर घणाघात

CM Uddhav Thackeray - JP Nadda

नवी दिल्ली : महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेने आमच्या बाजूने कौल दिला होता. मात्र सत्ता मिळवण्यासाठी आमच्यासोबत धोका झाला. आम्हीच विजय संपादन केले होते. देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत हाच कौल महाराष्ट्रातील तमाम जनतेने दिला होता. मात्र उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी आमचा विश्वासघात केला असं आता भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीने जे.पी. नड्डा यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांना अनेक मुद्दयांवर प्रश्न विचारण्यात आले.

काँग्रेससोबत तुम्ही निवडणूक जिंकता, मात्र जे राज्यांमधले जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांच्यासोबत तुम्हाला जिंकताना कष्ट घ्यावे लागतात. त्यावर जे.पी. नड्डा म्हणाले “महाराष्ट्रात उद्धव ठाकरे तर आमच्यासोबतच येऊन निवडणूक लढले होते. महाराष्ट्रात आम्ही पराभूत झालो नाही. महाराष्ट्रात आमच्यासोबत विश्वासघात झाला आहे. सत्तेसाठी भाजपाचा विश्वासघात करण्यात आला. फडणवीस मुख्यमंत्री होतील असाच जनमताचा कौल होता.” असं नड्डा यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER