उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि तुकाराम मुंढेंच्या फाईली वर आल्या : संजय राऊत

Sanjay Raut - Tukaram mundhe

नाशिक :- शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. नाशिक येथे विविध कामांच्या उदघाटनासाठी संजय राऊत आलेले असून त्यांनी सनदी अधिकारी तुकाराम मुंढेंच्या (Tukaram Mundhe) कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. फडणवीस सरकारचा तुकाराम मुंढे आले तेव्हा फाईली डब्यात गेल्या आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आले तेव्हा फाईली वर आल्या, असं संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत म्हणाले, “आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे जेव्हा आले तेव्हा फाईली डब्यात गेल्या, मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सरकार आलं तेव्हा त्या फाईली वर आल्या. यापुढे कोणत्याही फाईली ढगात जाणार नाहीत. महाराष्ट्रात वातावरण बदललं आहे. नाशिकचं वातावरण बदललं की महाराष्ट्रातलं वातावरण बदलतं. अनेक जुने सहकारी पुन्हा पक्षात आले. देशासाठी बलिदान देण्याची नाशिकला मोठी परंपरा आहे. निवडणुका येतात जातात. निवडणुका येतात म्हणून आपण काम करतो असं नाही. आपल्या रक्तात सामाजिक कार्य आहे. शिवसेनेची ती परंपरा आहे. त्यामुळेच लोक आपल्यामागे उभे राहतात. मागचा गोष्टी आणि काळ विसरुन जायला हवे. आता नवीन पहाट होत आहे. आपण त्या दिशेने पुढे जाऊया, असं संजय राऊत म्हणाले.

ही बातमी पण वाचा : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर संजय राऊतांचा सावध पवित्रा, म्हणाले…

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER